श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन ( फोटो )

दिनांक - ४ मे २०२१ 

भगवान पांडुरंग  



 श्री विठ्ठल भगवान यांना गडद लाल रंगाचा वेलवेट अंगरखा आणि हिरव्या काठाचे पांढरे धोतर असा पोशाख आहे . कपाळी चंदन आणि अबीर यांचा तिलक असून मस्तकी सुवर्ण मुकुट, कानात प्रसिद्ध मकरकुंडले गळ्यात अलंकार हातात सोन्याचे कडे आणि पायात सोन्याचा तोडा असा एकूण पेहराव आहे. 

रुक्मणी 

श्री रुक्मिणी मातेला जांभळ्या रंगाची साडी आहे. त्यावर गुलाबी रंगाची चोळी असा पोशाख आहे. कपाळी कुंकवाचा पूर्ण मळवट असून गळ्यात सुवर्ण अलंकार आहेत. मस्तकी मुकुट आणि त्यावर पांढऱ्या फुलांचा गजऱ्यासोबत गुलाब माळला आहे . कर्णफुले, कमरेला कंबरपट्टा  व हातात सोनाच्या बांगड्या आहेत.  माता रखुमाईच्या हे मनोहारी दर्शन आहे