ऑनलाईन दर्शन पास बुकिंग 

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने मागील काही वर्षांपासून ऑनलाईन दर्शन बुकिंगची सुविधा उपलब्द करून दिली आहे. या सेवेद्वारे आपण आपल्या दर्शनाची वेळ ठरवून त्यानुसार बुकिंग करू शकतो. आपल्या सोयीचा दिवस आणि वेळ निवडण्याची सुविधा असल्याने आपण त्याच वेळेत येऊन दर्शन करू शकतो. त्यामुळे आपला बराच वेळ वाचतो. आणि दर्शन रांगेत तासनतास उभा राहावे लागत नाही . त्यामुळे श्री विठ्ठल भक्तांनी पंढरपूरला येण्याचे ठरवले असेल तर आपल्या येण्याचा दिवस निश्चित करून त्या वेळेचे दर्शन पास आधीच बुक करावे. दर्शन पास बुक करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आपली सर्व माहिती द्यावी . आणि दर्शनास येताना आपले ओळखपत्र ( उदा. आधारकार्ड ) सोबत ठेवावे. ज्यामुळे दर्शन पासचा गैरवापर होणार नाही.  याद्वारे ग्रुप बुकिंगची सोय नाही, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे स्वतंत्र बुकिंग करावे लागेल. 

दर्शन पास सुविधा चालू किंवा बंद ठेवण्याचा अधिकार मंदिर समितीला आहे. प्रत्येक महिन्यातील दोन एकादशी, महत्वाचे सण उत्सव, विकेंड, सार्वजानिक सुट्ट्या, आणि इतर गर्दीच्या वेळी मंदिर समितीकडून ऑनलाईन दर्शन पास बंद ठेवले जाण्याची शक्यता आहे. जर पास बुकिंग करताना टाईम स्लॉट जनरेट होत नसेल तर हि सेवा तात्पुरती बंद आहे असे समजावे. त्यावेळी पारंपरिक पद्धतीने दर्शन रांगेतूनच दर्शन घ्यावे. 

मंदिर समितीने श्री विठ्ठल दर्शन बुकिंग वेबसाईटचा इंटरफेस बदलला आहे. आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून प्रथम लॉगिन करावे लागते. 

श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्य पानावर (homepage) जाण्यासाठी क्लिक करा

दर्शन पास कसा बुक करावा ? व्हिडीओ पहा 



या वेबसाईटवर आपल्याला श्री विठ्ठल रुक्मिणीचे खूप सारे फोटो उपलब्ध आहेत वेबसाईटच्या लोगोवर क्लिक करून आपण ते पाहू शकता 

#shrivitthalrukmini #darshanpassbooking #pandharpur