श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्र महोत्सव साजरा 
Shri Vitthal Rukmini Mandir, temple, pandharpur, vitthal darshan,

घटस्थापनेपासून नवरात्र महोत्सवास सुरवात सुरु झालेली आहे, या निमित्त दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे खंडेमहानवमी विजयादशमी दसरा दिवशी श्री विठ्ठल  व  माता रुक्मिणीला पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये रूक्मिणी मातेस श्री.विजयालक्ष्मी पोशाख परिधान करण्यात आल्याची  माहिती मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली.  
Shri Vitthal Rukmini Mandir, temple, pandharpur, vitthal darshan,

श्री विठ्ठलास सोन्याची पगडी, नामनिळाचा, कौस्तुभ मणी, दंड पेठया जोड, कंगन जोड, हिऱ्याचा मोत्याचा तुरा, शिरपेच लहान, मोत्याची कंटी दोन पदरी, मोठ्याची कंठी एक पदरी, बाजीराव कंठा, पुतळ्यांची माळ, मोहरांची माळ, तुळशीची माळ एक पदरी मोठी, बोरमाळ तीन पदरी, हिऱ्यांचे पैंजण, नवरत्नांचा हार, सोन्याचे घोंगडे, चांदीची कंठी, सोन्याचे पितांबर, सोन्याचे तोडे जोड, लॉकेट इ. अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
Shri Vitthal Rukmini Mandir, temple, pandharpur, vitthal darshan,

तसेच रुक्मिणी मातेस  जडावाचा मुकुट, तन्मणी मोठा, खड्यांच्या पाटल्या जोड, मोठी नथ, कर्णफुले जोड, सूर्य, चंद्र, जडावाचे तारवाड जोड, चिंचपेटी हिरवी, हातसर जोड, खड्यांची वेणी, जडावाचा हार, तन्मणी लहान, मोत्याचा कंठा लहान, पाचूची गरसोळी, बाजीराव गरसोळी, खड्याची बिंदी, जाडावाचे बाजूबंद जोड, रूळ जोड, पैंजण जोड, सोन्याचा करंडा, मस्त्य जोड, तारामंडळ, तोडे जोड, सोनाचे बाजूबंद जोड, दशावतारी हार, मद्रासी कंठा, शिन्देहार ३ पदरी, मास पट्टा, सोने साडी, छत्रछामार इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
Shri Vitthal Rukmini Mandir, temple, pandharpur, vitthal darshan,

तसेच राधिका मातेस नक्षी टोप, मोत्याचा कंठा मोठा, हायकोल, चिंचपेटी तांबडी, ठुशी  व  सत्यभामादेवीला सिद्धेस्वर टोप, लक्ष्मीहार मोहरांची माल, जवमनी पदक, इत्यादी अलंकार व प्रथा परंपरेप्रमाणे पोशाख परिधान करण्यात आलेले आहेत. 

तसेच मंदिर समितीच्या अख्त्यातरीत असलेल्या पंढरपूर शहर व परिसरातील लखुबाई, अंबाबाई, पद्मावती, यल्लमादेवी, यमाई-तुकाई माता आदी परिवार देवतांना देखील पारंपारिक पोषाख करण्यात आल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

**********************

हि सेवा विनामूल्य असली तरी आपण विठ्ठल दर्शन या वेबसाईटला ऐच्छिक देणगी देऊ शकता.

vitthaldarshan.com ही सेवा भाविकांसाठी विमुल्य आहे. परंतु ही सेवा चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैश्याची गरज भासत असते. त्यामुळे भाविकांनी आपल्या इच्छेने देणगी द्यावी. जेणेकरून हि सेवा अखंड चालू ठेवता येईल.