श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, आषाढी वारी नंतरची प्रक्षाळ पूजेचा व्हिडिओ
दरवर्षी केली जाते साधारण आषाढ शुद्ध प्रतिपदेपासून ते आषाढी एकादशी आणि पौर्णिमा असे साधारण पंधरा दिवस श्री विठ्ठल भगवान आपल्या लाडक्या भक्तांना दर्शन देण्यासाठी अहोरात्र तिष्ठत उभा असतो. त्यामुळे थकून गेलेल्या भगवंतांना आराम मिळावा यासाठी ही प्रक्षाळ पूजा केली जाते. प्रक्षाळ पूजेनंतर देव विश्रांती घेतात. म्हणजे प्रक्षाळ पूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील नित्योपचार सुरू होतात. त्याचबरोबर चातुर्मासाचा ही आरंभ होतो. त्यामुळे प्रक्षाळ पूजा हा एक महत्त्वाचा विधी आहे. त्याचा हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला इथे पाहता येईल. ज्यामध्ये पूजा विधि, देवाचे स्नान, वस्त्र, पोशाख, अलंकार, इत्यादी सर्व उपचार या व्हिडिओमध्ये पाहता येतील.
1 Comments
nice
ReplyDelete