विजयादशमी दसरा निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट
पंढरपूर, दि.२०: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमी (दसरा) निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांचा व आकर्षक पानांचा वापर करून मनमोहक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
या सजावटीसाठी झेंडू, अष्टर, शेवंती, गुलाब, ऑर्किड, अँथुरियम, कार्नेशन, सूर्यफूल, तगर, गुलछडी, लक्ष्मी कमळ, ब्लू डेझी, पिंक डेझी आदी विविध प्रकारच्या फुलांचा, तसेच जिप्सोफिला, कमिनी, अशोकाची पाने, मनीप्लांट आणि ड्रॅसिना यांसारख्या शोभिवंत पानांचा वापर करण्यात आला आहे. विविध रंगांच्या फुलांची सुबक मांडणी आणि आकर्षक रचनेमुळे ही पुष्प सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
राम जांभुळकर, पुणे यांनी ही पुष्पसजावट सेवा सेवाभावी तत्त्वावर विनामूल्य उपलब्ध करून दिली असल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी दिली.
**********************
हि सेवा विनामूल्य असली तरी आपण विठ्ठल दर्शन या वेबसाईटला ऐच्छिक देणगी देऊ शकता.
vitthaldarshan.com ही सेवा भाविकांसाठी विमुल्य आहे. परंतु ही सेवा चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैश्याची गरज भासत असते. त्यामुळे भाविकांनी आपल्या इच्छेने देणगी द्यावी. जेणेकरून हि सेवा अखंड चालू ठेवता येईल.




0 Comments